


येळ्ळूर : येथील समाज शिक्षण संस्थेची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या अध्यक्षा लीलाताई मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेच्या प्रारंभी संस्थेचे संचालक पुंडलिक मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संस्थेचे सेक्रेटरी जीवन घाडी यांनी लेखापरीक्षण अहवाल तसेच मागील वर्षाचा जमाखर्चाचा अहवाल सादर केला.
यावेळी हणमंत पाटील आणि शेखर पाटील यांनी समाज शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत महाराष्ट्र हायस्कूलच्या प्रगतीविषयी विवेचनात्मक विचार मांडले. तसेच संस्थेच्या आणि शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपाययोजनाही सुचवल्या.
सभेच्या व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र गिंडे, सेक्रेटरी जीवनकुमार घाडी, पुंडलिक मेणसे आणि पंकज जाधव उपस्थित होते.
या सभेला संस्थेचे संचालक विवेक मेणसे, रावजी पाटील, विलास घाडी, आनंद पाटील, शिवाजी मेणसे, रवी बुवा, संजय मेणसे, प्रदीप कुगजी आदी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन पुंडलिक मेणसे यांनी केले, तर आनंद पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta