Monday , October 5 2026
Breaking News

दसरा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती दसरा महामंडळाचे महापालिकेला निवेदन

Spread the love

 

बेळगाव : बेळगावचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला दसरा महोत्सव यंदाही उत्साहात, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी मध्यवर्ती दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने सोमवारी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्त श्रीमती लक्ष्मी निपाणीकर यांनी निवेदन स्वीकारून प्रशासनाच्या वतीने सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगावचा दसरा महोत्सव शिस्तबद्ध आणि देखण्या पद्धतीने साजरा केला जात आहे. ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यासाठी महामंडळ आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे पूर्वतयारीची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, विद्युत रोषणाई, स्वच्छता तसेच मुख्य सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या ठिकाणची आवश्यक पूर्वतयारी प्रशासनाने वेळेत पूर्ण करावी, अशी विनंती करण्यात आली. महोत्सवाच्या काळात नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन आवश्यक सुविधा आणि व्यवस्थापनाची कामे लवकर सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी मध्यवर्ती दसरा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, उपाध्यक्ष संदीप कामुले, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, किरण हुद्दार, हर्षल नाईक, जोतिबा धामणेकर, प्रसाद मरगाळे यांच्यासह विविध देवस्थानांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री देव दादा सासणकठीचे लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, पंकज किल्लेकर, गिरीश पाटील, सौरभ पवार, मारुती गल्ली मारुती देवस्थानचे प्रमोद बिरजे, मातंगी देवस्थानचे बुद्रुद्दीन, वीरभद्र देवस्थानचे मुर्गेंद्र अंगडी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *