


बेळगाव : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून संजीविनी फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित विविध स्पर्धांना रविवारी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जी. जी. चिटणीस स्कूल, टिळकवाडी येथे सकाळी ८ वाजता स्पर्धांना प्रारंभ झाला.
शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेत आपली कला, कौशल्य आणि खेळाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
कॅरम, क्ले मॉडेलिंग, रांगोळी, पेटिंग, १०० मीटर धावणे, लिंबू-चमचा, मूनवॉक, स्लो रेस, म्युझिकल चेअर आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वयाची साठी ओलांडल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांनी दाखविलेला उत्साह आणि स्पर्धात्मक भावना विशेष कौतुकास्पद ठरली.
स्पर्धेतील विजेत्यांना चेअरमन मदन बामणे, संस्थापक डॉ. सविता देगीनाळ, शुभांगी मिसाळे, सरीता कालकुंद्रीकर, तेजस पवार,रेखा बामणे, डॉ नवीना शेट्टीगार,विद्या सरनोबत, प्रीती चौगुले आणि संजय पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्रांसह सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी चेअरमन मदन बामणे यांनी या उपक्रमामागील उद्देश ज्येष्ठ नागरिकांना केवळ विरंगुळा उपलब्ध करून देणे नसून, त्यांच्या शारीरिक हालचाली, मानसिक आनंद, सामाजिक सहभाग आणि आत्मविश्वासाला चालना देणे हा असल्याचे सांगितले स्पर्धे दरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी दाखविलेला उत्साह पाहून आम्ही खूप आनंदी झालो असून यापुढेही या स्पर्धा अजून मोठ्या प्रमाणात घेऊ असेही सांगितले
एकूणच वय वाढते, पण उत्साह आणि उमेद कधीही कमी होत नाही याचा प्रत्यय या स्पर्धांमधून आला. संजीविनी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी संजीविनीच्या तसेच जी जी चिटणीस स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले
स्पर्धांतील विजेते
कॅरम स्पर्धा :
प्रथम – परशुराम भंडारे
द्वितीय – अनंत कुचेकर
तृतीय – दयानंद तारीहाळकर
– मनोहर अंकले
क्ले मॉडेलिंग :
प्रथम – अलका अष्टेकर
द्वितीय – वनिता जोशी
तृतीय – वनिता शिरोळ
रांगोळी :
प्रथम – वासंती गोमनाचे
द्वितीय – आशा देशपांडे
तृतीय – प्रभावती मिरजकर
पेटिंग :
प्रथम – अलका अष्टेकर
द्वितीय – एन. एम. काकडे
तृतीय – रघुनाथ कुंदरी
१०० मीटर धावणे – पुरुष (६० ते ७० वर्षे) :
प्रथम – अरुण तळेबैलकर
द्वितीय – किसन यळुरकर
तृतीय – रामचंद्र गाडगीळ
१०० मीटर धावणे – महिला (६० ते ७० वर्षे) :
प्रथम – वंदना शहा
द्वितीय – नीलम दोरेण्णावर
तृतीय – वासंती गोमनाचे
१०० मीटर धावणे – ७० वर्षांवरील :
प्रथम – सुर्यकांत देवराणी
द्वितीय – विजय वाइंगडे
तृतीय – मारुती कणबरकर
लिंबू-चमचा – पुरुष (६० ते ७० वर्षे) :
प्रथम – किसन यळुरकर
द्वितीय – बाळासाहेब पाटील
तृतीय – सुरेंद्र देसाई
लिंबू-चमचा – महिला :
प्रथम – राजश्री हावळ
द्वितीय – रंजना पीसे
तृतीय – अनघा मोकाशी
मूनवॉक – ६० ते ७० वर्षे :
प्रथम – रूपा अनुपकुमार
द्वितीय – राजश्री हावळ
तृतीय – पुष्पा भोसले
मूनवॉक – ७० वर्षांवरील :
प्रथम – सुमन कब्बुर
द्वितीय – रजनी जोशी
तृतीय – रंजना पीसे
मुनवॉक– पुरुष :
प्रथम – सुरेंद्र देसाई
द्वितीय – चंद्रशेखर जोशी
तृतीय – संजीव नाईक
सॅक रेस– महिला :
प्रथम – डॉ. सुरेखा भंडारी
द्वितीय – वनिता जोशी
तृतीय – जयश्री नाईक
सॅक रेस – पुरुष :
प्रथम – अरुण तळेबैलकर
द्वितीय – औदुंबर शेट्टे
तृतीय – मनोहर अंकले

Belgaum Varta Belgaum Varta