Tuesday , October 6 2026
Breaking News

सदाचारी कैद्यांच्या वेळेपूर्वी सुटकेसाठी चाचपणी

Spread the love

 

हिंडलगा कारागृहातील ८ कैद्यांचा प्रस्ताव समितीसमोर

बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सदाचारी कैद्यांना नियमानुसार वेळेपूर्वी मुक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
शासनाच्या आदेशानुसार, अतिरिक्त पॅरोल न घेता १४ वर्षांची शिक्षा पूर्ण केलेल्या पुरुष कैद्यांचा आणि १० वर्षांची शिक्षा पूर्ण केलेल्या महिला कैद्यांचा वर्तनाच्या आधारे सुटकेसाठी विचार केला जातो. त्यानुसार हिंडलगा कारागृहातील आठ कैद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला असून, त्यांच्या वर्तन व पात्रतेची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, कारागृहातील कैद्यांकडून विविध गृहोपयोगी वस्तू तयार केल्या जातात. या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांचा वापर करण्याबरोबरच विविध मेळावे व प्रदर्शनांमध्ये विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले.
सुटकेनंतर कैद्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांशी जोडण्याची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

“स्वर तरंग”ची सुरेल मैफल : बासरी व भावगीत गायन

Spread the love  मराठी भाषाप्रेमी मंडळातर्फे आयोजन बेळगांव : येथील मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगाव व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *