Tuesday , October 6 2026
Breaking News

पशुखाद्याचे दर कडाडले, शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले

Spread the love

 

व्यवसायाला फटका : तालुक्यातील दूध व्यावसायिक चिंताग्रस्त

निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील दुग्धव्यवसाय सध्या
पशु खाद्याच्या वाढत्या दरांमुळे अडचणीत सापडला आहे. सतत होत असलेल्या या दरवाढीमुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढला असून शेतकरी व दुग्धव्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडत चालले आहे.
बाजारात पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांचा जनावरांच्या पालन पोषणाचा खर्च वाढला आहे. पावसाअभावी पशुखाद्याचे उत्पादनही कमी झाले आहे. एवढे होत असूनही दुसरीकडे मात्र दुधाला मिळणारा दर त्या तुलनेत वाढलेला नाही.
अनेक लहान-मोठ्या उत्पादकांनी आता खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी पशुखाद्य कमी प्रमाणात देण्याचा पर्याय स्वीकारला असून काही जण तर या समस्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी उपायांचा शोध घेत आहेत. याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होत आहे.
घट होत राहिल्यास भविष्यात दूध टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही दुग्ध व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. वाढत्या खर्चामुळे दुग्धव्यवसाय टिकवणे कठीण होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
——————————————————————–
पशुखाद्याचे दर
पशुखाद्याचा प्रकार – (६० किलो)

सरकी – २७५० ते २८००
प्रथिने खाद्य – (५० किलो) १७००
इंद्रनील -१५५०
चुनी – १८०
हिरा – १७५०
हाय-प्रो – २४००
माका भरडा – १५५
गहू भुसा- १२५०

About Belgaum Varta

Check Also

प्रा. विठ्ठल नाईक यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल

Spread the love  निपाणी (वार्ता) : शिक्षण, समाजसेवा आणि पत्रकारिता क्षेत्रातील कामाची दखल घेत प्रा. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *