


बेळगाव : सीमाभागात मराठी भाषेचे जतन व्हावे या दृष्टिकोनातून, इंग्रजी, कन्नड आणि इतर माध्यमांत शिकणाऱ्या, परंतु मराठी भाषा लिहिता-वाचता यावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांसाठी युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय मराठी भाषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
ही कार्यशाळा दिनांक १२ ते १६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान संपन्न होणार असून, यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. मातृभाषा मराठी असूनही मराठी भाषा लिहिता-वाचता येत नाही, ही खंत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. त्यासाठीच सुलभ आणि कमी वेळात मराठी भाषा लिहिता-वाचता यावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. मराठी भाषेचे तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
या वर्षी या कार्यशाळेचे पहिलेच वर्ष असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अध्यक्ष अंकुश केसरकर 9739963229आणि सरचिटणीस श्रीकांत कदम 9611756529 यांच्याशी संपर्क साधावा.

Belgaum Varta Belgaum Varta