Monday , October 5 2026
Breaking News

“स्वर तरंग”ची सुरेल मैफल : बासरी व भावगीत गायन

Spread the love

 

मराठी भाषाप्रेमी मंडळातर्फे आयोजन

बेळगांव : येथील मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगाव व संलग्न संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळ यांच्या वतीने आयोजित “स्वर तरंग” कार्यक्रमाने रविवारची (४ ऑक्टोबर) सायंकाळ सुरेल बनली.
या कार्यक्रमात प्रा. दत्ता नाडगौडा, नचिकेत सुहास गुर्जर, पद्मा नाडगौडा, वैष्णवी नाडगौडा व वैभव गाडगीळ यांनी आपली कला सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

नाट्य दिग्दर्शिका निता कुलकर्णी यांनी स्वागत केल्यावर मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कुमार पाटील, नितीन कपिलेश्वरकर, विलास पेडणेकर, सौ. पूजा पाटील व पद्मा बाडकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. पद्मा नाडगौडा यांच्या श्री गणेश स्तुतीने कार्यक्रमास प्रारंभ झाला.

या कार्यक्रमात पद्मा नाडगौडा यांनी जगाचा जनीचा पंढरीशी, महारुपे तुम्ही सदाशिव, नमोस्तुते, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, वैकुंठाचा राणा तोचि नारायणा, रघुराजाचा नगरी जाऊन ही गीते तर वैष्णवी नाडगौडा यांनी आज अयोध्या सजली, घनघनमाला नभी दाटल्या, चाफा बोलेना चाफा चालेना ही मराठी व सलोनासा सजन है और मैं हूं, कुहू कुहू बोले कोयलिया व उमराव जान चित्रपटातील इन आँखोकी मस्तीचे ही हिंदी गाणी सादर केली. तसेच प्रा. दत्ता नाडगौडा यांनी बासरीवर मेरा दिलही टूट गया, आंसू भरी है, एक मेरे दिले ना जा, हमे तुम्हे प्यार किया व बेकार करके हमे यू नो ही चित्रपट गाणी सादर केली.
नचिकेत गुर्जर यांनी बासरीवर वैष्णव जन तो तेणे कहिये हे महात्मा गांधी यांचे भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले. वैभव गाडगीळ यांनी सोलो तबलावादन केले.
उपस्थित रसिकांनी कलाकारांच्या सादरीकरणाला उस्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता कुलकर्णी यांनी केले. विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटी या कार्यक्रमाची संयोजक संस्था होती.
तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमास रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

युवा समिती सीमाभागचे एकंबावासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत व सन्मान

Spread the love  सीमालढ्यासाठी एकत्रितपणे ठोस पावले उचलण्याचा ग्रामस्थांचा निर्धार एकंबा : महाराष्ट्र एकीकरण युवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *