Monday , October 5 2026
Breaking News

नवरात्रोत्सवासाठी मंडप, देखावे उभारणीला वेग

Spread the love

 

रोषणाईने शहर उजळणार; गरबा-दांडियासह धार्मिक सांस्कृतिक कार्यकम
निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवाच्या प्रारंभासाठी केवळ सहा दिवसाचा शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून मंडप उभारण्याची लगबग शहर आणि ग्रामीण भागात दिसून येत आहे. यंदाही टिपरी आणि गरबा घुमणार असल्याने तरूणाईमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातीलही दूगार्मातेची प्रतिष्ठापना करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. गरबा, दांडियासाठी प्रशासनाने परवानगी परवानगी दिल्याने विविध मंडळ आणि संघटनाकडून दांडिया नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या चार दिवसापासून मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मूर्तीकारही मूर्ती सजावटीच्या कामात व्यस्त आहेत. दांडिया स्पर्धेतील बक्षिसे मिळविण्यासाठी दांडिया ग्रुपची तयारी सुरू आहे. दांडियासाठी फॅन्सी दांडिया, विशेष कपड्यावर सुसंगत ज्वेलरी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. दांडिया स्पर्धेसाठी खास गायक, वाद्यवृंदासाठी आधीच बुकींग सुरू आहे. पाऊस नसला तरीही वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहेत.
—————————————————————–
मंडपाची जागा निवडणे, मंडप बांधण्यासाठी आवश्यक साहित्य (बांबू, लाकूड, कापड), मंडप सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू (दीप, फुले, रंगीबेरंगी कपडे), मंडपात मूर्ती ठेवण्याची व्यवस्था, आणि विद्युत रोषणाईची योजना बाबत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठका होत आहेत. यासाठी स्थानिक कारागीर आणि कुशल कामगारांची मदत घेतली जात आहे. मंडप उभारणीसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या जात आहेत.
मंडपाच्या आत आणि बाहेर आकर्षक रंगीबेरंगी कापडांची सजावट,रोषणाई अशी कामे दोन-तीन दिवसात पूर्ण होणार आहेत.
——————————————————————–
‘सध्या मंडप उभारणीची कामे सुरू असून दोन दिवसात ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर दुर्गादेवी मूर्ती प्रतिष्ठापणेसाठी विविध प्रकारची आरास आणि सजावट होणार आहे. यावर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.’
-अरुण खडके,
अध्यक्ष, दक्षिणाभिमुख नवरात्रोत्सव मंडळ, प्रगतीनगर, निपाणी 

About Belgaum Varta

Check Also

बोरगांव विविधोद्देशीय ग्रामीण कृषी कृषी संघातर्फे मृत सभासदांना दोन लाखाची मदत

Spread the love    निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगांव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *