


बसरीकट्टीजवळ सोशल वर्कर रेस्क्यू टीमची तत्परता : हरण वन विभागाकडे सुरक्षित हस्तांतरण
बेळगाव : बसरीकट्टी गावाजवळील चंदनहोसूर परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाची सोशल वर्कर रेस्क्यू टीम बेळगावने तत्परतेने सुटका केली.
काल पहाटे रहिवासी परिसरात जखमी अवस्थेत हरीण आल्याची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाला चावा लागल्याने ते गंभीर अवस्थेत होते. टीमचे सदस्य अवधूत तुडवेकर, शशिकांत अंबेवाडकर आणि राजू टक्केकर यांनी हरणाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. यानंतर जखमी हरणाला पुढील वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसनासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.
वन्यजीवाच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी रेस्क्यू टीमने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलतेचे स्थानिक ग्रामस्थ व प्राणीप्रेमींनी कौतुक केले.

Belgaum Varta Belgaum Varta