


खानापूर : भेंडीगिरी गावातील नागरिकांनी गणेशमूर्ती नदीकाठी ठेवून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्थान, परीश्ववाड-खानापूर संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते व समाजसेवक सोमेश नागोजी यांनी पुढाकार घेतला.
नदीकाठी विसर्जनाच्या प्रतीक्षेत ठेवलेल्या गणेशमूर्ती त्यांनी एकत्रित केल्या. त्यानंतर सर्व मूर्तींचे विधिवत नदीमध्ये विसर्जन करून धार्मिक परंपरेसोबतच परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
सोमेश नागोजी यांच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, गणेशमूर्तींचा योग्य पद्धतीने सन्मानपूर्वक विसर्जन करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta