Sunday , October 4 2026
Breaking News

भारतीय हॉकीचा बेळगांवात विजयोत्सव

Spread the love

 

बेळगाव : एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय हॉकीने ऐतिहासिक कामगिरी करत महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावले. या दुहेरी सुवर्णविजयानंतर बेळगावमध्येही हॉकीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
धर्मवीर संभाजी महाराज चौकात हॉकी बेळगावच्या वतीने हॉकीपटू आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी मिठाई वाटून भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम सामन्यात चीनचा १-० असा पराभव करत तब्बल ४४ वर्षांनंतर एशियन गेम्सचे सुवर्णपदक पटकावले. १९८२ नंतर प्रथमच भारतीय महिलांनी हा मान मिळवला.
दुसरीकडे, पुरुष संघाने अंतिम सामन्यात मलेशियाचा ५-१ असा पराभव करत २०२३ नंतर पुन्हा एकदा सुवर्णपदकावर नाव कोरले. सलग दुसऱ्यांदा एशियन गेम्सचे सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी भारतीय पुरुष संघाने केली.
यावेळी बोलताना हॉकी बेळगावचे सचिव सुधाकर चाळके यांनी बेळगावला ऑलिम्पिक खेळाडूंची गौरवशाली परंपरा असल्याचे सांगितले. अॕस्ट्रोटर्फ ग्राउंडची उभारणी झाल्यास बेळगावमधूनही देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार हॉकीपटू घडू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय हॉकीच्या या ऐतिहासिक दुहेरी सुवर्णयशाचा आनंद बेळगावच्या क्रीडाप्रेमींनी उत्साहात साजरा केला.
यावेळी उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, उत्तम शिंदे, स्वानंद गोडबोले, रमाकांत कारेकर, विकास कलघटगी, प्रकाश बिळगोजी, माजी महापौर संजय शिंदे, निखिल शिंदे, संतोष दरेकर, कुदळे, चेतन दोडमणी, सविता हेब्बार, सविता वेसणे, सुप्रिया कारेकर, तनुश्री कोलार, दयानंद कारेकर, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चारित्र्यावर संशय घेत पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; पती अटकेत

Spread the love  रायबाग : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मानसिक त्रास देणाऱ्या पतीने कुऱ्हाडीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *