Sunday , October 4 2026
Breaking News

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love

 

खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले प्रा. आर. एस. पाटील यांची टाईम्स ऑफ इंडिया आणि विजय कर्नाटक यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित राज्यस्तरीय ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

प्रा. आर. एस. पाटील हे शांतिनिकेतन पब्लिक स्कूल व महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटी, खानापूरचे संस्थापक सचिव आहेत. तसेच ते दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलचे उपाध्यक्ष असून, शेख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या ते ज्योती महाविद्यालयात कार्यरत आहेत.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देतानाच विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, यासाठी प्रा. पाटील यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी झालेली निवड ही खानापूरसह संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी बेंगळुरू येथील ताज एम. जी. रोड येथे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी प्रा. पाटील यांची निवड झाल्याबद्दल शिक्षण क्षेत्र, विद्यार्थी, पालक तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका; बेळगावकर हैराण

Spread the love  महिनाभर पावसाची दडी; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट, नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम बेळगाव : ऑक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *