Sunday , October 4 2026
Breaking News

चारित्र्यावर संशय घेत पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; पती अटकेत

Spread the love

 

रायबाग : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मानसिक त्रास देणाऱ्या पतीने कुऱ्हाडीने डोक्यात वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील मडलगी (मर्डी) येथे घडली. या प्रकरणी रायबाग पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

कल्लव्वा सदाशिव मर्डी असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती सदाशिव रामा उर्फ रामाप्पा मर्डी (वय 67) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, मागील सहा महिन्यांपासून आरोपी पत्नीवर संशय घेत होता. याच कारणावरून तो तिला मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता कल्लव्वा गावातील सर्व्हे क्रमांक 65 मधील शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून डोक्यात गंभीर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 350/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 85 व 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसर्गी आणि अथणी उपविभागाचे डीवायएसपी प्रशांत जी. मुन्नोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली. पोलीस निरीक्षक एम. एम. डप्पिन, पीएसआय नंदीश व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

प्रकरणाचा पुढील तपास रायबाग पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका; बेळगावकर हैराण

Spread the love  महिनाभर पावसाची दडी; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट, नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम बेळगाव : ऑक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *