Sunday , October 4 2026
Breaking News

‘जय महाराष्ट्र’ प्रकरणी दोषारोप निश्चित

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नव्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याच्या निर्णयानंतर बेळगावात दाखल झालेल्या बसच्या स्वागतप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले.

सन 2017 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या नव्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याचा आदेश दिला होता. कर्नाटकचे तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याबाबत घेतलेल्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली बस प्रथमच बेळगाव बसस्थानकात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे मदन बामणे, गणेश दड्डीकर, सूरज कणबरकर, मेघन लंगरकांडे यांनी बसचे स्वागत करून ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दिल्या. या प्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात भादंवि कलम 143, 147, 153 (अ), व सहकलम 149 कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात बसचालक देविदास हरी बोराट आणि वाहक प्रमोद शंकर गायकवाड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांची केस स्वतंत्र करण्यात आली आहे.

जेएमएफसी द्वितीय न्यायालयात संबंधित कार्यकर्त्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले असून, पुढील सुनावणीची तारीख नोव्हेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे आणि अॅड. अश्वजीत चौधरी हे कार्यकर्त्यांच्या वतीने काम पाहत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *