Sunday , October 4 2026
Breaking News

अक्कोळ भैरवनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावरआयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अक्कोळ भैरवनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत दीप्ती खोत हिने १०० मीटर धावणे प्रथम, लांब उडीत द्वितीय व तिहेरी उडीत तृतीय क्रमांक मिळवला. समर्थ मगदूम याने लांब उडी व उंच उडीत प्रथम, गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
तन्वी एनपे हिने उंच उडीत द्वितीय, समर्थ कुंभार याने तिहेरी उडीत द्वितीय, आराध्या कदम हिने गोळाफेकमध्ये द्वितीय तर आरती चौगुले हिने भालाफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

ऊसाच्या फडातून ट्रॅक्टर बाहेर काढताना अपघात; शिवापूरवाडीच्या युवकाचा मृत्यू

Spread the love  निपाणी (वार्ता) : ऊसाच्या फडातून भरलेला ट्रॅक्टर बाहेर काढत असताना तोल जाऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *