Sunday , October 4 2026
Breaking News

सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस कार्यालयात जनता दरबार कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या उपस्थितीत जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन तात्काळ निराकरण करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत तालुका आणि परिसरातील नागरिकांनी विविध शासकीय योजना, नागरी सुविधा, रस्ते, पाणी, शहरातील रिक्षा थांब्यासह प्रशासकीय पातळीवरील अडचणी जिल्हाध्यक्षांसमोर मांडल्या. प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेत चिंगळे यांनी उपस्थित नागरिकांना दिलासा देत स्थानिक व प्रशासकीय अडचणींवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून त्या तातडीने सोडवण्याच्या कडक सूचना दिल्या.
बैठकीस सामाजीक कार्यकर्ते दीपक सावंत, राजु कोपार्डे, फारुख पटेल, जावेद कोल्हापुरे, रघुनाथ नाईकवडे, लोकेश घस्ते,भालचंद्र पारळे, बाळासाहेब कमते, उत्तम कामते, सुंदर खराडे, राजू पाटील, श्याम टिकारे, चेतन राजपूत, अनिल केसरकर, यासीन हबीब, प्रकाश जाधव यांच्यासह निपाणी तालुक्यातील अनेक नागरिक, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. सर्वांनी जिल्हाध्यक्षांच्या या तत्पर भूमिकेबद्दल आणि समस्या निवारणाच्या प्रयत्नांबद्दल आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

ऊसाच्या फडातून ट्रॅक्टर बाहेर काढताना अपघात; शिवापूरवाडीच्या युवकाचा मृत्यू

Spread the love  निपाणी (वार्ता) : ऊसाच्या फडातून भरलेला ट्रॅक्टर बाहेर काढत असताना तोल जाऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *