


निपाणी (वार्ता) : बोरगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बाबाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांचा उरुसाला २५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या काळात पवित्रता, शांतता, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यासाठी उरुस कमिटी पदाधिकाऱ्या समवेत उत्तम पाटील यांनी परिसराची पाहणी केली.
उरुस काळात शहरवासीयासह बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवण्यासह नगरपालिका, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग व हेस्कम विभागाचे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे, शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, दर्गा परिसराची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. उरुसापूर्वी परिसरात आतील बाजूस सिमेंट काँक्रीट रस्ते करणे यासह विविध विषयावर चर्चा करून सर्व बाबी अंमलात आणण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, भैय्या अफराज, फारूक मुजावर, अब्दुल शेख, आप्पा मुजावर, अनिस मुजावर, हैदर मुजावर, इरफान मुजावर, नगरसेवक अभयकुमार मगदूम, मकानदार, दिगंबर कांबळे, सिकंदर अफराज, इमरान अफराज, फिरोज अफराज यांच्यासह नगरसेवक, पुरुष कमिटीचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta