
बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडी हिने उत्कृष्ट कामगिरी करून एक सुवर्ण व दोन रौप्य पदकांची भरघोस कमाई केली.
4 x 100 मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये कर्नाटक राज्य संघात समाविष्ट असलेल्या दिशाने सुवर्णपदकाची कमाई केली तर 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये 28 सेकंद देऊन रौप्य पदक तसेच 100 मीटर बटरफ्लाय मध्ये 1: 08 सेकंद वेळ देऊन रौप्य पदक अशी भरघोस कामगिरी केली.
दिशा होंडी ही सध्या इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अकॅडमी भुवनेश्वर येथे सराव करीत असून तिला वडील राजेश आई श्वेता तसेच आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे सर्व पदाधिकारी आणि एन आय एस कोच श्री. विश्वास पवार यांचे प्रोत्साहन लाभते. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta