Saturday , August 22 2026
Breaking News

१५ दिवस शवागृहात असलेल्या अनोळखी मृतदेहाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला अखेरचा निरोप

Spread the love

 

बेळगाव : गेल्या १५ दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवण्यात आलेल्या अनोळखी मृतदेहावर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. मृत व्यक्तीची ओळख पटवून नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र कोणीही पुढे न आल्याने बेळगाव सोशल वर्कर रेस्क्यू टीमने माणुसकीच्या भावनेतून अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली.

या उपक्रमासाठी अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, अॅलन विजय मोरे, विकी मेहता, मायकेल पिंटो आणि शंकर लामाणी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी खडेबाजार पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी यल्लप्पा सर तसेच खडेबाजार पोलिसांचे सहकार्य मिळाले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बेळगाव महानगरपालिकेच्या सहकार्याने हिंदवाडी स्मशानभूमीत अनोळखी मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

नातेवाईक किंवा ओळख नसली तरी प्रत्येक व्यक्तीला अखेरच्या क्षणी सन्मान मिळावा, या भावनेतून सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या या सेवाकार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

‘माणुसकीला ओळखीची गरज नसते’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडले.

About Belgaum Varta

Check Also

बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा एल्गार; बेळगावात पुतळा दहन, रास्ता रोको अन् जेलभरो

Spread the love  बेळगाव : मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून बेळगाव भाजपने शनिवारी सरकारविरोधात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *