Saturday , August 22 2026
Breaking News

बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love

 

बिदर : बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता औराद (ब.) तालुक्यातील बोंठी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष रामराव राठोड, सचिव पृथ्वीराज पाटील आणि सदस्य प्रा. डी. डी. शिंदे -पाटील यांनी केले आहे.

बैठकीत सीमाभागातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी बिदर जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळ घेऊन जाण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच सीमाभागातील सरकारी व खासगी कार्यालयांच्या फलकांवर, तसेच बी व सी श्रेणीतील रस्ते आणि महामार्गांवरील दिशादर्शक व माहिती फलकांवर मराठी भाषेत नावे लिहिण्याची मागणी करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.

मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांवर आगामी काळात संघटितपणे पाठपुरावा करण्यासाठी बैठकीत व्यापक चर्चा होणार असून, जिल्ह्यातील सर्व मराठी भाषिकांनी उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे संस्थापक सदस्य व कार्यकर्ते म्हणून समितीच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यान्ह आहारात कर्नाटक आघाडीवर; ९२ टक्के विद्यार्थी योजनेचा लाभ घेतात

Spread the love  दररोज ५४.४ कोटींचा खर्च; रागी मुद्दे, दूध, अंडी, केळींसह पौष्टिक आहारावर भर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *