Saturday , August 22 2026
Breaking News

इस्कॉनतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने येत्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान या आंतर शालेय स्पर्धा तीन गटांमध्ये होतील. त्यामध्ये गट ए पहिली ते चौथी, गट बी पाचवी ते सातवी आणि गट सी आठवी ते दहावी असे गट आहेत.
24 ऑगस्ट रोजी कथा कथन स्पर्धा, 25 ऑगस्ट रोजी भक्ती गीत गायन स्पर्धा, 26 ऑगस्ट रोजी भगवत गीता श्लोक पठण स्पर्धा, 29ऑगस्ट रोजी क्विझ, 30 ऑगस्ट रोजी रंगोली आणि त्याच दिवशी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होतील.
अधिक माहितीसाठी 9980706936, 9611405021 किंवा 9845761757 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणातील दुसरा शुक्रवार भक्तिभावाने साजरा; बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

Spread the love  बेळगाव : व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासातील दुसरा शुक्रवार महिलांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *