Thursday , August 20 2026
Breaking News

फाउंड्री क्लस्टरमध्ये गांजाची विक्री; उचगावच्या तरुणाला बेड्या

Spread the love

 

१ किलो २१२ ग्रॅम गांजासह मोटारसायकल, मोबाईल जप्त; १.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बेळगाव : उद्यमबाग परिसरातील फाउंड्री क्लस्टरजवळ खुलेआम गांजाची विक्री करणाऱ्या उचगाव येथील तरुणाच्या मुसक्या आवळण्यात उद्यमबाग पोलिसांना यश आले. पोलिसांनी सापळा रचून गांजा विक्री करताना सागर सुरेश मोरे (वय २९, रा. उचगाव) याला रंगेहाथ अटक केली.

मोरे याच्याकडून १ किलो २१२ ग्रॅम गांजा, गांजा विक्रीसाठी वापरण्यात येणारी मोटारसायकल आणि मोबाईल संच जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ३ हजार ३१० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोरे हा पेंटिंगचे काम करीत असून, फाउंड्री क्लस्टर परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाळत ठेवून कारवाई केली. अमली पदार्थ विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील गांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

खडेबाजारचे एसीपी चेक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबागचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पत्रकाद्वारे या कारवाईची माहिती दिली. शहरात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बालमनातील कवितेतून संस्कार आणि समाजप्रबोधन घडावे : निळूभाऊ नार्वेकर

Spread the love  बेळगाव येथे दुसरे बालकवी संमेलन उत्साहात; ५७ बालकवींनी सादर केल्या कविता बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *