Thursday , August 20 2026
Breaking News

शारदा विद्यालयात मोफत नेत्रतपासणी शिबिर

Spread the love

 

 

बेळगाव : शहापूर येथील शारदा विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी एम. एम. जोशी कोडकणी आय केअर सेंटरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराच्या प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. स्वाती घोडेकर यांनी नेत्रतज्ञांचे स्वागत केले. यावेळी यशवंत जोशी यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांचे आरोग्य, डोळ्यांची योग्य निगा तसेच नेत्रविकारांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले.

नेत्रतज्ञ अक्षता बजंत्री व रामय्या तुरमुरी यांनी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची नेत्रतपासणी केली.

शाळेच्या शिक्षिका सौ. रचना कणबरकर यांनी एम. एम. जोशी कोडकणी आय केअर सेंटरचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाबद्दल शाळेतील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना भविष्यातही सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण रस्ते दुरुस्त करा; तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

Spread the love  बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, गणेशोत्सव मंडळांना सुविधा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *