


उचगाव : येथील श्री मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शंकर-पार्वती मंगल कार्यालयात संस्थापक-चेअरमन जवाहरराव शंकरराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
श्री मळेकरणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने सभेची सुरुवात झाली. संचालक चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते श्री मळेकरणी देवीच्या प्रतिमेचे पूजन, तर मारुती सावंत, लुम्माण्णा पावशे, किशोर पावशे, निळकंठ कुरबुर व कविता जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपाध्यक्ष अॅड. अनिल पावशे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पी. आर. चलवेटकर यांनी निवेदन व अहवालाचे वाचन केले. सूत्रसंचालन संचालिका प्रविणा देसाई यांनी केले.
सभेत नफा-तोटा पत्रक, ताळेबंद, अंदाजपत्रक व नफा विभागणी पत्रकाचे वाचन संचालक बाळकृष्ण देसाई यांनी केले. सचिव के. एन. कदम यांनी लेखापरीक्षण अहवाल सादर केला. सोसायटीला यंदा १० लाख १६१ रुपये ७९ पैसे इतका नफा झाला. ‘अ’ वर्ग सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ सभासद सदानंद हळदणकर व मष्णू गोजगेकर यांना लाभांश वितरण करण्यात आले. तसेच एसएसएलसी परीक्षेत उचगाव केंद्रातून प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा, निवृत्त शिक्षक व सभासदांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. अध्यक्ष जवाहरराव देसाई यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. संचालक सुरेश बेनके यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta