Sunday , October 4 2026
Breaking News

निपाणी परिसरात दाट धुक्यासह ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हलक्या प्रमाणात दिसणारे धुके गुरुवारी (१ ऑक्टोबर) रोजी गडद झाले होते. निपाणीकरांची गुरुवारची पहाट दाट धुक्यांनीच उजाडली. सकाळी शहरासह परिसरात सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती.
दोन दिवसापासून पहाटे वातावरणात गुलाबी थंडी पसरू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून तर शहर व परिसरात किरकोळ पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच गुरुवारी (ता.१) सकाळी शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली होती. दाट धुक्यामुळे शहरातील व बाहेरील रस्तेसुद्धा दिसत नव्हते. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. शिवाय वाहनांचे दिवे लावून वाहने चालवावी लागली.

दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले आणि कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना धुक्यातून वाट काढावी लागत होती. पंधरा ते वीस फुटांवरील घरे, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती.
दिवसभर तापमानात वाढ होऊन रात्रीच्या वेळी कधी थंडी पडत आहे. तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. कधी किरकोळ पाऊस आणि सकाळी दाट धुके सुध्दा पडताना दिसून येत आहे. या बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तवली जात आहे. त्यामध्ये कांदा, उन्हाळी कांदा रोप बुरशीजन्य रोगाला सामोरे जात आहेत. तर गहू, हरभरा, भाजीपाला पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होत आहे. काही ठिकाणी हरभऱ्यांची पिके मर रोगाने करपुन जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन पिकवलेले पिक वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरमध्ये सण-उत्सवांची पर्वणी

Spread the love  सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *