Monday , October 5 2026
Breaking News

युवा समिती आणि ‘राज्य मराठी विकास’ संस्थेचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा अभिमान निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या वक्तृत्वकलेला आणि विचार मांडण्याच्या क्षमतेला चालना देण्यासाठी अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य मंदिरात रविवारी (ता. ११) ही स्पर्धा होणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा तीन गटांत स्पर्धा घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार विविध विषयांवर वक्तृत्व सादर करण्याची संधी मिळणार आहे.

प्राथमिक गटातील चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोबाईल गेम की मैदानी खेळ’, ‘माझी प्रेरणा : छत्रपती शिवाजी महाराज’, ‘मी शिक्षणमंत्री झालो/झाले तर’ आणि ‘मातृभाषेतून शिक्षण’ हे विषय देण्यात आले आहेत.

माध्यमिक गटातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट फोन : मानाचा सेवक की मालक’, ‘शेती आणि शेतकरी : बदलते आव्हान’, ‘मराठी भाषा टिकविण्यासाठी माझे योगदान’ आणि ‘पर्यावरण संवर्धन : आजची गरज, उद्याची जबाबदारी’ हे विषय ठेवण्यात आले आहेत.

महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : काळाची गरज की भविष्यावरील धोका?’, ‘जेन-झी आंदोलन : नव्या काळातील क्रांती’, ‘मराठी भाषा संवर्धन : युवकांची भूमिका’ आणि ‘डिजिटल भारत : संधी, आव्हाने आणि भविष्य’ हे विषय असतील.

प्रत्येक गटातील स्पर्धकांनी दिलेल्या चार विषयांपैकी एका विषयाची निवड करून वक्तृत्व सादर करायचे आहे. विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम मुदत १० ऑक्टोबर असून इच्छुक विद्यार्थ्यांनी टिळकवाडी येथील युवा समिती कार्यालयाशी किंवा युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

(प्रत्येक गटासाठी पहिल्या ३० स्पर्धकांनाच प्रवेश असेल, याची नोंद घ्यावी.)

श्रीकांत कदम – 7019668025
प्रतीक पाटील – 7338145673
आशिष कोचेरी – 9886103373

अधिक माहितीसाठी संपर्क –
अध्यक्ष – अंकुश केसरकर – 9739963229
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *