Monday , October 5 2026
Breaking News

कावळेवाडीत दुर्गामाता नवरात्रोत्सवाची मुहूर्तमेढ

Spread the love

 

कावळेवाडी : येथील श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या नवरात्रोत्सवाची मुहूर्तमेढ मोठ्या उत्साहात रोवण्यात आली. गावातील भजनी मंडळाच्या सहकार्याने टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून मुहूर्तमेढ मिरवणूक काढण्यात आली.

मंडळाच्या वतीने सलग तेराव्या वर्षी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. गावडू एम. मोरे यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढीची विधिवत पूजा करून ती रोवण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोपाळ जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

याप्रसंगी उत्तम बाचीकर, यल्लापा ओऊळकर, बाळू मोरे, विक्रम बाचीकर, भुजंग मोरे, ज्ञानेश्वर जाधव, किरण यळ्ळूरकर, शेखर मोरे, प्रज्योत ओऊळकर, निवृत्ती कार्वेकर, सुशांत बडसकर, लक्ष्मण मोरे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *