


निपाणी (वार्ता) : येथील आश्रयनगर, शाहूनगर परिसरातील अनेक ठिकाणी मधील गटारी फुटल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर तुंबलेली गटार स्वच्छ करण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आश्रयनगर येथे सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना शासनाच्या आश्रय योजनेतून तश घरे मंजूर झाली होती. येथील गटार गेल्या काही दिवसापासून तुंबल्या आहेत. घंटागाडीद्वारे कचरा उचल केला जातो. परंतु काही भागात रोज घंटागाडी जात नसल्याची तक्रार आहे. प्रभात टॉकीजजवळ कचरा टाकला जात होता. तेथील ब्लॅक स्पॉट ते हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. परंतु आता तेथे पुन्हा कचरा पडू लागला आहे. अनेक नागरिक घंटागाडीला कचरा न देत नसून गटाऱ्यांचीही मोडतोड झाल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून काही घरांमध्ये हे पाणी शिरले आहे. याबाबत पालिकेत तक्रार करूनही अद्याप येथील गटारी स्वच्छ केलेल्या नाहीत. शहरात उघड्यावर कचरा टाकत आहेत. पालिका प्रशासनाने शहर परिसरातील गटारी स्वच्छ करण्याची मागणी होऊ लागली आहे. चाटे मार्केट, जुना मोटर स्टॅन्ड परिसरातील गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. त्याकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष देऊन गटाऱ्यांची दुरुस्ती करण्यासह रस्त्यावर कचरा हटवण्याची मागणी होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta