Monday , October 5 2026
Breaking News

बेळगावात ३ व ४ ऑक्टोबरला ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ. विजय चोरमारे यांचे व्याख्यान

Spread the love

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि सार्वजनिक वाचनालय, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दोन दिवसीय ज्ञानसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार, दि. ३ आणि रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गणपत गल्ली येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात हे ज्ञानसत्र होणार आहे.

‘मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या ज्ञानसत्रात कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक डॉ. विजय चोरमारे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. ‘प्रबोधन परंपरा आणि मराठी प्रदेश’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

मराठी भाषेची समृद्ध परंपरा, प्रबोधन चळवळीचे योगदान आणि मराठी प्रदेशातील वैचारिक-सामाजिक परिवर्तन यांसारख्या विषयांवर या ज्ञानसत्रातून विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी आणि साहित्यिक-सांस्कृतिक जाणिवांच्या वृद्धीसाठी अशा उपक्रमांना विशेष महत्त्व आहे.

About Belgaum Varta

Check Also

महात्मा गांधी संस्थेतर्फे क्रीडा प्रशिक्षक व राज्य स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा सन्मान

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे राज्य व राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *