Sunday , October 4 2026
Breaking News

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मंत्री जोशी यांच्या निवासस्थानासमोर दिवसभर एल्गार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवास स्थानासमोर मंगळवारी (ता.२९) दुपारी १२ आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात कर्नाटकातील कर्नाटक राज्य रयत संघटना आणि महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले आहेत. कर्नाटक राज्य रयत संघटना कार्याध्यक्ष राजू पोवार आणि महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनामुळे हुबळीतील मंत्री श्रीपाद जोशी यांच्या निवासस्थान परिसरात सर्वच रस्ते शेतकऱ्यांनी बंद केले होते. पोलिसांचा मोठा फौज फाटा ठेवूनही कार्यकर्ते व शेतकऱ्यांना आवरणे कठीण झाले आहे.
कर्नाटक राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्रातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मंगळवारी (ता.२९) सकाळी ८ वाजता कोगनोळी टोल नाका, निपाणी संगोळ्ळी रायना सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी येथील मुक्ती मठाजवळ सर्वांनी एकत्र जमून हुबळीकडे रवाना झाले. हत्तरगी येथील मोर्चाप्रसंगी राजू पोवार म्हणाले, यंदाच्या हंगामातील ऊस पिकाला किमान ५५०० रुपये प्रति टन दर देऊन कारखाने सुरू करावेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांना योग्य दर द्यावे, २०१९ पासून साखरेचा किमान आधारभूत किंमत ३१ रुपये होता.परंतु २०१९ ते २०२६ या काळात ऊस लागवडीवरील खर्च वाढला आहे. याशिवाय खाते, बी-बियाणे, लावण्यासाठी वाढलेली मजुरी, शेतीची मशागत अशा विविध कामांचे दर वाढले आहेत त्यामुळे वर्षभर कष्ट अरुणही शेतकऱ्यांचे हाती काहीच मिळत नाही. त्यामुळे ऊस पिकाला खर्चाच्या तुलनेत जर जाहीर होईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुनाप्पा पुजेरी, राज्य मुख्य सचिव किशन नंदी, राज्य मानद अध्यक्ष शशिकांत गुरुजी, प्रकाश नायक, धारवाड जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय नेते सुभाष मदनवरा, सुनील पाटील, बबन जामदार, मधुकर पाटील, कालगोंडा कोटगे, बाबासाहेब पाटील, सर्जेराव हेगडे, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, संजय पोवार सूर्याजी पोटले यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरमध्ये सण-उत्सवांची पर्वणी

Spread the love  सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *