


बेळगाव : आगामी दिनांक २ आणि ४ ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या कर्नाटक शासनाच्या स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षांचे गांभीर्य आणि काटेकोर नियोजन लक्षात घेून एक उच्चस्तरीय मार्गदर्शक प्रशिक्षण वर्ग नुकताच येथील एस.जी.बी.आय.टी. (SGBIT) सेमिनार हॉलमध्ये अत्यंत शिस्तीत संपन्न झाला. स्पर्धा परीक्षांच्या पवित्र्याशी तडजोड न करता परीक्षा अतिशय संवेदनशीलतेने आणि कडक नियमावलीनुसार पार पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असून, त्यादृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सज्ज करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी मान श्री. रोशन बेग यांच्या कडक निर्देश व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस बेळगाव व चिकोडी पदवीपूर्व विभागाचे उपसंचालक (DDPU) श्री. एम. एम. कांबळे आणि श्री. लिंगराजू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, जिल्हा ट्रेझरी अधिकारी श्रीमती विना मॅडम व इंजिनिअरींग महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पटगुंदी यांची विशेष उपस्थिती लाभली. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरील कमालीची गोपनीयता आणि गांभीर्य लक्षात घेऊन, या बैठकीला बेळगाव व चिकोडी शैक्षणिक क्षेत्रातील सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संपत्तीमुल व्यक्ती (तज्ज्ञ मार्गदर्शक) म्हणून डॉ. नागराज मराण्णावर यांनी उपस्थितांना परीक्षेच्या नियमांचे व तांत्रिक बाबींचे सखोल मार्गदर्शन पी पी टी च्या साह्याने अतिशय सुंदर रितीने केले त्यामुळे अनेक समस्यांचे निवारण सहज झाले.
नियोजनातील त्रुटी परीक्षा spoil करू शकतात जिल्हा शिक्षणाधिकारी श्री . एम. एम. कांबळे यांचा कडक इशारा!
या ट्रेनिंग सेशनदरम्यान बेळगावचे डी.डी.पी.यू. श्री. एम. एम. कांबळे यांनी आपल्या नेहमीच्या विनोदी आणि ओघवत्या शैलीचा वापर केला असला, तरी त्यामागील गांभीर्य स्पष्ट शब्दांत अधोरेखित केले. कोणतीही स्पर्धा परीक्षा ही केवळ कागदावरील औपचारिकता नसून ती संपूर्ण अचूक नियोजनावर आणि विश्वासावर अवलंबून असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षा यंत्रणेतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी कोणतीही कसूर न ठेवता अत्यंत निष्पक्षपणे पार पाडली पाहिजे, अशी ताकीद त्यांनी दिली. ही परीक्षा राज्य पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा असल्याने, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा त्रुटी खपवून घेतली जाणार नाही. परीक्षा पूर्णपणे पारदर्शक, निष्कलंक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे हे आपल्या सर्वांचे सर्वोच्च आणि परम कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना संपूर्ण प्रक्रियेचे गांभीर्य पटवून दिले.
या प्रशिक्षण सत्रामुळे परीक्षांच्या आयोजनातील संवेदनशीलतेची जाणीव सर्व संबंधितांना झाली असून, कोणत्याही गैरप्रकाराला थारा न देता परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असल्याचे त्यांनी ओघवत्या भाषेत नमुद केले!

Belgaum Varta Belgaum Varta