


बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी खो खो, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून
सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे. मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत माध्यमिक विभाग मुले प्रथम व मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला व प्राथमिक विभागाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक व मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.डी .पी शाळेच्या सभागृहामध्ये संपन्न झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तन्मयी पावले प्राथमिक विभाग रितेश मुचंडीकर व रोहिणी बोकमूरकर माध्यमिक विभाग या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.जिल्हा क्रीडांगणावर संपन्न झालेल्या तालुकास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये इंद्रजीत चौगुले 100 मीटर द्वितीय क्रमांक, 200 मीटर प्रथम क्रमांक, आणि लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक, अभय पाटील 80 मीटर अडथळा शर्यत द्वितीय क्रमांक, वैष्णवी पाटील 80 मीटर अडथळा शर्यत द्वितीय क्रमांक, सृष्टी पावशे उंच उडी प्रथम क्रमांक मिळविला असून या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, समन्वयक सविता पवार, शिक्षण संयोजिका निला आपटे, शाळेचे क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील, वैभवी दळवी व प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta