Friday , November 6 2026
Breaking News

बेळगावात मांजाचा धोका वाढला; रेल्वे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

Spread the love

 

कपिलेश्वर उड्डाणपुलावर घटना; नाकाला सहा टाके

बेळगाव : बेळगाव शहरात पतंगाच्या मांजाच्या धाग्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलावरून जात असताना मांजाचा धागा अडकल्याने रेल्वे पोलीस कर्मचारी बी. आर. नाईक यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. सोमवारी (२६ ऑक्टोबर) घडलेल्या या घटनेत त्यांच्या नाकाला सुमारे सहा टाके घालावे लागले.

शहरातील प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांनाही मांजाच्या धाग्याचा धोका निर्माण झाला आहे. हा धागा गळ्यात, चेहऱ्यावर किंवा नाकाला अडकल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. यापूर्वीही बेळगावातील छायाचित्रकार विश्वनाथ देसाई यांना मांजामुळे दुखापत झाली होती.

मांजाच्या धाग्यामुळे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. धोकादायक मांजाची विक्री आणि वापर रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरातील वर्दळीचे रस्ते, उड्डाणपूल आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. मांजाच्या धोक्याबाबत जनजागृती करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *