Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

गणेशोत्सवानिमित्त ‘आरती संग्रह’ पुस्तकांचे वाटप; श्री. रमेश पावले यांचा स्तुत्य उपक्रम

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत श्री. रमेश पावले यांच्या पुढाकाराने ‘आरती संग्रह पुस्तक वाटप’ उपक्रम उत्साहात पार पडला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि भक्तीभाव घराघरांत पोहोचावा, तसेच गणरायाच्या आरतीचा मंगलमय नाद प्रत्येक घरात घुमावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविक व नागरिकांना यावेळी आरती …

Read More »

पीओपी गणेश मूर्तींवर कडक बंदी; नियम मोडल्यास कारवाई

  जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा इशारा; सार्वजनिक गणेश मंडळांना मातीच्या मूर्तींचे आवाहन बेळगाव : न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपीच्या गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापना आणि विसर्जनावर बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सार्वजनिक …

Read More »

जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शोभा निलजकर यांचा सत्कार

  येळ्ळूर : मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथील शिक्षिका सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या एसडीएमसीतर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शनिवारी सकाळी शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी एसडीएमसीच्या सर्व सदस्यांच्या …

Read More »

गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

    बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील केळकर बाग परिसरातील व्यापारी संघटनेने रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात व्यापाऱ्यांनी उपपोलीस आयुक्त नारायण भारमणी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गणेशोत्सव काळात ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या संख्येने नागरिक रात्री १० वाजल्यानंतरही खरेदीसाठी बाजारपेठेत …

Read More »

पंडित नेहरू हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले. या स्पर्धेत राजू दोडमणी, पृथ्वीराज तुळजाई, समर्थ पाटील, समर्थ डुकरे आणि अथर्व निकम यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. त्यांच्या या यशामुळे पाचही विद्यार्थ्यांची आता जिल्हास्तरीय कुस्ती …

Read More »

‘जय गणेश श्री – 2026’ बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या चषकाचे अनावरण

  बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स आणि मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘जय गणेश श्री – 2026’ बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. क्लब रोड येथील डॉ. संजय सुंठकर यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ट्रॅफिक विभागाचे असिस्टंट कमिशनर ज्योतिबा …

Read More »

शहापूरमध्ये गणेशोत्सवानिमित्त आरती संग्रहाचे प्रकाशन व मोफत वितरण

    बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश आरती संग्रहाचे प्रकाशन व मोफत वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समितीचे नेते नेताजी जाधव, सार्वजनिक गणेश महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण, जत्तीमठाचे सरपंच दत्ता जाधव, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, समितीचे नेते महादेव पाटील, शिवाजी हावळानाचे, राजकुमार बोकडे यांच्या …

Read More »

कांगोतील सोन्याच्या खाणीत सतीश जारकीहोळींची गुंतवणूक?

  ईडीच्या तपासात परदेशी कंपन्यांतील शेअर्ससह कोट्यवधींची रोकड जप्त बेळगाव : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित व्यक्ती आणि काही निकटवर्तीयांच्या ठिकाणी केलेल्या झडतीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपासासंदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, या तपासात आफ्रिकेतील कांगो आणि झांबिया येथील काही खाण कंपन्यांमधील कथित गुंतवणुकीचे …

Read More »

अलायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट १३१चा पुढाकार; हिरेबागेवाडीच्या डोंगरावर पहिल्या टप्प्यात २२० काजू-आंब्याची लागवड

  ७०० रोपट्यांतून उभा राहणार ‘हरित’ संकल्प! बेळगाव : पर्यावरणाचा ढासळता समतोल, वाढते प्रदूषण आणि बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम पाहता वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता न राहता लोकचळवळ बनणे गरजेचे आहे. रोपटे लावणे सोपे; मात्र त्याला जगवून वृक्षरूप देणे ही खरी पर्यावरणसेवा आहे, या भावनेतून अलायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट १३१ने ७०० …

Read More »

दिव्यांग संस्थेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; प्राणघातक हल्ल्याच्या तपासाला वेग देण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

  बेळगाव : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांनी दिले. दरम्यान, शहापूर येथील दिव्यांग संस्थेतील कथित गैरव्यवहार व भ्रष्ट कारभाराची माहितीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांसमोर मांडल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण …

Read More »