Friday , November 6 2026
Breaking News

डिसेंबरअखेर शैक्षणिक सहलींचे नियोजन पूर्ण करा

Spread the love

 

 

 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण खात्याच्या शाळांना सूचना

बेळगाव : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबरोबरच अभ्यासक्रम पूर्ण करण्यास आणि परीक्षेच्या उजळणीस पुरेसा वेळ मिळावा, यासाठी शिक्षण खात्याने शाळांना डिसेंबरअखेर शैक्षणिक सहलींचे नियोजन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सहलींसाठी परिवहन खात्याच्या बसेसची आगाऊ नोंदणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रात प्रामुख्याने शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील विविध शाळांमध्ये सहलींचे नियोजन सुरू असते. मात्र, काही शाळांकडून सहलींच्या नियोजनात विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन, अभ्यासक्रमाची पूर्तता आणि परीक्षेची तयारी यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक सुरळीतपणे पूर्ण करणे हे शिक्षकांसमोर मोठे आव्हान असते. निर्धारित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांची उजळणी घेणे आवश्यक असल्याने सहलींचे आयोजन वेळेत करणे महत्त्वाचे ठरते. डिसेंबरअखेर सहलींचे उपक्रम पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत अभ्यासक्रमाची पूर्तता, सराव आणि परीक्षापूर्व तयारीवर लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व शाळांनी डिसेंबरअखेरपर्यंत सहलींचे नियोजन पूर्ण करून आवश्यक वाहतूक व्यवस्था आगाऊ निश्चित करावी, असे स्पष्ट निर्देश शिक्षण खात्याने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बाधा न आणता सहलींचा आनंद घेता यावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *