Friday , November 6 2026
Breaking News

बोरगाव शर्यतीत विद्याधर कमतेंची बैलगाडी प्रथम

Spread the love

 

टोपच्या वीरेन भोसले यांची गाडी द्वितीय : बोरगाव ऊरूस निमित्त शर्यती

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील दैवत हजरत पीर बाबा ढंगवाली व हजरत पीर हैदरशा मदारशा यांच्या ऊरूस पार पडला. त्यानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जनरल बैलगाडी शर्यतीत बोरगाव मधील विद्याधर कमते यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना २१ हजाराचे बक्षीस देण्यात आले.
नगर पंचायतीचे नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, उपनगराध्यक्ष भैय्या अफराज, नगरसेवक प्रदीप माळी, तुळशीदास वसवाडे, सिकंदर अफराज, बबन निकम यांच्यासह ऊरूस, शर्यती कमिटीच्या श हस्ते शर्यती मैदानाचे उद्घाटन झाले.

टोप (अंबप) येथील विरेन भोसले यांची बैलगाडीने द्वितीय क्रमांक मिळवून १५ हजाराचे तर संदीप मानकापूर यांनी तृतीय क्रमांक मिळवून १२ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. जनरल घोडा- बैल शर्यतीमध्ये अक्षय मोळे -बोरगाव, रोहित लाड -अब्दुल लाट, धनाजी हराळे यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकाची ७ हजार, ५हजार, ३ हजारांची बक्षीस देण्यात आली.
आदत बैल-घोडा या शर्यतीमध्ये वीर पाटील -बोरगाव, महेश डोंगरे -कोंडीग्रे, सचिन परीट हातकणंगले यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार रुपये बक्षिसे व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी संजय पवार, चाँदसाहेब अफराज, अकबर अभिजीत इंडे, इरफान अपराज, तुफान अपराज, पोपट सोमाने, यांच्यासह हिंदू मुस्लीम ऊरूस शर्यती कामिटी पदाधिकारी, शर्यती शौकीन उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *