Friday , November 6 2026
Breaking News

२०२१ च्या महामोर्चा खटल्याची शुक्रवारी सुनावणी

Spread the love

 

खटल्यातील सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव : मराठी भाषेतील कागदपत्रांसाठी २५ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी हा मोर्चा धर्मवीर संभाजी महाराज चौकात रोखला होता. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्त्यांनी चौकातच धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली होती.

कोरोना काळातील निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून या आंदोलनप्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात समितीचे नेते व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी बेळगाव येथील पाचवे अतिरिक्त न्यायालयात होणार आहे.

या खटल्यातील काही संशयित कार्यकर्ते सुनावणीच्या वेळी वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्यांच्या अनुपस्थितीबाबत गंभीर दखल घेतली असून, यापुढे गैरहजर राहणाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची सक्त ताकीद दिल्याचे सांगण्यात आले आहे.

खटला क्रमांक १४५/२०२१ मधील सर्व संबंधित कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन वकील महेश बिर्जे यांनी केले आहे.

या खटल्यातील कार्यकर्त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : मनोहर कल्लाप्पा किनेकर, प्रकाश आप्पाजी मरगाळे, शुभम विक्रांत शेळके, प्रकाश रामचंद्र शिरोळकर, किरण गोविंदराव गावडे, रेणू सुहास किल्लेकर, सरिता विराज पाटील, श्रीकांत नाथाजी मांडेकर, रवी महादेव साळुंखे, धनंजय राजाराम पाटील, मदन बाबुराव बामणे, मालोजी शांताराम अष्टेकर, नेताजी नारायण जाधव, बंडू शंकर केरवाडकर, गजानन पाटील, संदीप सुभाष चौगुले, दिगंबर मारुती कातकर, परेश गोपाळ शिंदे, विनायक यल्लाप्पा सांबरेकर, हनुमंत कृष्णा मजुकर, रामचंद्र शंकर कुद्रेमानीकर, विनायक बाळकृष्ण पावशे, नागेश बळीराम किल्लेकर, उदय नारायण नाईक, अनिल बबन हेगडे, माधुरी अनिल हेगडे, संदीप काशिनाथ मोरे, मल्हारी पावशे, चेतन पारिस पाटील आणि कृष्णा भरमा गुरव.

सर्व संबंधितांनी सुनावणीच्या दिवशी वेळेत न्यायालयात उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *