



बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील द्वितीय पीयूसी (बारावी) परीक्षेच्या पहिल्या सत्राचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात २७ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत परीक्षा होणार आहेत.
परीक्षेची सुरुवात २७ फेब्रुवारी रोजी कन्नड आणि अरेबिक विषयांच्या पेपरने होईल. १ मार्च रोजी इंग्रजी, तर २ मार्च रोजी तमिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी, उर्दू, संस्कृत आणि फ्रेंच या भाषांचे पेपर होणार आहेत.
परीक्षेचे विषयवार वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
– २७ फेब्रुवारी : कन्नड, अरेबिक
– १ मार्च : इंग्रजी
– २ मार्च : तमिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी, उर्दू, संस्कृत, फ्रेंच
– ३ मार्च : भूगोल, मानसशास्त्र
– ४ मार्च : समाजशास्त्र, भौतिकशास्त्र
– ५ मार्च : लेखाशास्त्र
– ६ मार्च : महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी; परीक्षा नाही
– ८ मार्च : रसायनशास्त्र, शिक्षणशास्त्र, मूलभूत गणित
– ९ मार्च : अर्थशास्त्र, भूगर्भशास्त्र
– १० मार्च : रमजाननिमित्त सुट्टी; परीक्षा नाही
– ११ मार्च : हिंदुस्थानी संगीत आणि व्यावसायिक विषय
– १२ मार्च : व्यवसाय अध्ययन, गणित
– १३ मार्च : ऐच्छिक कन्नड, तर्कशास्त्र, गृहविज्ञान
– १५ मार्च : राज्यशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्र
– १६ मार्च : संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स
– १७ मार्च : हिंदी
– १८ मार्च : इतिहास
१८ मार्च रोजी इतिहासाच्या परीक्षेसह द्वितीय पीयूसी परीक्षेच्या पहिल्या सत्राची सांगता होणार आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करावे, तसेच परीक्षेसंदर्भातील अधिकृत सूचनांसाठी मंडळाच्या घोषणांकडे लक्ष द्यावे.
Belgaum Varta Belgaum Varta