



एक लाख रुपये आणि चार फूट उंचीचा आकर्षक चषक; २०० स्पर्धकांचा सहभाग
उडुपी (वार्ता) : उडुपी येथील अलांकुर गावात आयोजित भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत शहाबुद्दीन याने उत्कृष्ट शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. त्याला रोख एक लाख रुपये आणि चार फूट उंचीचा आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तब्बल २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत आर्यन याने उपविजेतेपद मिळविले. त्याला ४० हजार रुपये रोख आणि तीन फूट उंचीचा चषक प्रदान करण्यात आला. तर बेस्ट पोझरचा किताब मेलांगाकी याने पटकावला. त्याला २० हजार रुपये रोख आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेतील विविध गटांमधील विजेत्यांना एकूण चार लाख रुपयांची पारितोषिके, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
आयर्न टेंपलचे मालक हर्षित गौडा यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे पंच म्हणून राजेश लोहार, अनिल आंबरोळे, शशिकांत उल्लाळ, भारत बाळेकुंद्री, श्रीधर बारटक्के, बाबू पावशे, रमेश शेट्टी आणि राजेश अल्वा यांनी काम पाहिले. स्टेज मार्शल म्हणून नवीन कुलाल आणि धीरज पुजारी यांनी जबाबदारी सांभाळली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हर्षित गौडा यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने स्पर्धकांचा सहभाग आणि आकर्षक पारितोषिकांमुळे या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Belgaum Varta Belgaum Varta