Friday , November 6 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये आकाश कंदील व दिवाळी अंकांचे प्रदर्शन

Spread the love

 

बेळगाव : द.म.शि. मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक आकाश कंदील व विद्यार्थ्यांच्या लेखणीतून साकारलेल्या दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश पाटील, मुख्याध्यापक बी जी पाटील, नारायण उडकेकर, शिक्षण समन्वयक सविता पवार, नीला आपटे बालमंदिर प्रमुख सीमा कंग्राळकर उपस्थित होते.
सुरुवातीला प्रास्ताविक व स्वागत इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी स्वरा नीलजकर हिने केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते आकाश कंदीलांचे तोरण बांधून व दिवाळी अंकांचे प्रकाशन करून उद्घाटन करण्यात आले. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये भाग घेऊन इको फ्रेंडली पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविले होते. या आकाश कंदीला वरती वेगवेगळे सामाजिक संदेशही विद्यार्थ्यांनी दिले होते. यातून विद्यार्थ्यांनी आपले समाजभान प्रकट केले. त्याचबरोबर जवळपास 70 हून अधिक दिवाळी अंक विद्यार्थ्यांनी तयार केले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता, कथा, प्रवासवर्णने, विनोदी चुटके, कोडी, चित्रे, संवाद यांचा समावेश केला होता. या दिवाळी अंकांची नावे व मुखपृष्ठ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांच्या मध्ये सृजनशीलता वाढावी हा यामागचा उद्देश होता. विद्यार्थ्यांनी या कामांमध्ये आनंद मिळविला व खऱ्या अर्थाने साहित्याची दिवाळी साजरी केली.यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. आकाश कंदील बनविण्यासाठी कला शिक्षिका लता नगरे व स्वानंद टकेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती परमोजीने व आभार अनिश सूर्यवंशी याने व्यक्त केले.

 

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *