Friday , November 6 2026
Breaking News

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वकिलांचे कामकाज बंद

Spread the love

 

चुन्नप्पा पुजारी यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ राणी चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने

बेळगाव : ऊस उत्पादकांच्या आंदोलनादरम्यान शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बेळगावातील वकिलांनी कामकाज बंद ठेवून आंदोलन केले. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे एकत्र आलेल्या वकिलांनी सरकार आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असताना त्यांना बळजबरीने ताब्यात घेणे, ही बाब अन्यायकारक असून त्यांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे. ऊस उत्पादक शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या उसाला योग्य दर मिळावा, यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल वकील संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन न्याय्य तोडगा काढणे ही सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकून त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी वकील संघटनेच्या वतीने करण्यात आली. या निषेधार्थ वकिलांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

About Belgaum Varta

Check Also

अनाथाश्रमातील मुलांना नवीन कपड्यांचे वाटप

Spread the love    बेळगाव : दिवाळीच्या मंगलमय सणानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या सदस्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *