Friday , November 6 2026
Breaking News

सुरांनी जिंकले चेन्नई! ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय भरारी

Spread the love

 

दक्षिण विभागीय राष्ट्रीय समूह गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, राज्यपालांच्या हस्ते गौरव

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थ्यांच्या समूहाने चेन्नई येथे आयोजित दक्षिण विभागीय राष्ट्रीय समूह गायन स्पर्धेत (NGSC) द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
भारत विकास परिषद, तामिळनाडू उत्तर प्रांत यांच्या वतीने आयोजित या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत विविध राज्यातील संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस वितरण व विजयोत्सव समारंभ चेन्नई येथे मोठ्या थाटात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तामिळनाडूचे माननीय राज्यपाल थिरु. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरेल सादरीकरणाचे, सांघिक भावनेचे आणि शिस्तीचे सर्वत्र कौतुक झाले.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत आणि संगीत शिक्षिका अक्षता मोरे आणि श्री. विनायक मोरे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. याबद्दल शाळेच्या एस्.एम्.सी. कमिटीचे चेअरमन प्रो. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. श्री. आर. एस्. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्य श्री. मनोहर करडी यांनी विजयी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या सांस्कृतिक क्षेत्रातील गौरवात भर पडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *