



निपाणी (वार्ता) : दिवाळीच्या तोंडावर येथील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक-ग्रामस्थांच्या उपस्थितीत फटाके न फोडता प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.
येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतर मराठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत प्रार्थनेच्या वेळी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. प्रारंभी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनायक बाचणे यांनी फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, अपघात आणि इतर बाबींची माहिती दिली. संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पचंडी यांनीही केले. यावेळी महेश खोत यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
येथील अंकुरम इंग्लिश मीडियममध्ये पर्यावरणपूरक आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी चेतना चौगुले होत्या. संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले चौगुले यांनी, फटाक्यामुळे हातापायाच्या डोळ्यांना होणारी इजा आणि पर्यावरणाला होणाऱ्या धोक्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीत फटाके न पडता पर्यावरण पूरक आकाश कंदील निर्माण करण्याची शपथ घेतली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. उत्तम पाटील, डॉक्टर जोतिबा चौगुले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta