Friday , November 6 2026
Breaking News

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राजू खिचडे यांचा निपाणीत सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे राजू कुमार खिचडे यांचा भूमी वात्सल्य फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, गुलाबरोप व वृक्षरोपे यावेळी देण्यात आली.
पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी, समाजासाठी कार्य करताना अनेक वर्षे जपलेली बांधिलकी, लोकहिताची तळमळ आणि शैक्षणिक क्षेत्रातील खिचडे यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. या पुढील काळातही त्यांनी सामाजिक कार्यात झोकून घेण्याचे आवाहन केले.
राजू खिचडे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अपूर्वा चौगुले यांच्यासह भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संचालक व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *