



बेळगांव : आनंदनगर रेसिडेन्टस् असोसिएशन (रहिवासी संघटना) यांच्या विद्यमानाने आणि शिव मंदीर विश्वस्थ मंडळ (ट्रस्ट), उत्कर्ष महिला मंडळ यांच्या सहकार्याने आनंदनगर मधील ज्येष्ठ सभासद, सेवानिवृत्त. विशेष सन्मान प्राप्त व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच शिवमंदीरच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष आप्पाजी कुगजी हे होते तर शिवमंदीर विश्वस्थ मंडळचे अध्यक्ष श्रीपाद रेवणकर आणि उपाध्यक्ष परशराम घाडी, उत्कर्ष महीला मंडळच्या अध्यक्षा शुभांगी पाटील आणि उपाध्यक्षा चंद्रकला घाडी ह्या होत्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आणि शिक्षण महर्षी परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आप्पाजी गोरल तर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शेखर करंबळकर हे होते. स्वागताध्यक्ष आप्पाजी कुगजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि सदर कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. शिवपिंडीचे पुजन रमेश गोरल यांनी मर नंदीचे पुजन शेखर करबंळकर यांनी केले. दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आनंदनगरची स्थापना आम्ही केवळ 25 ते 30 रहिवाश्यांनी एकत्र येऊन 16-3-1994 मध्ये केली. आज आमचे 200 हून जास्त सभासद झाले आहेत. सुरुवातीला येथे केवळ क्रॉस नं. 1, 2 व 3 एवढेच होते. पाणी, डांबरी रस्ते, गटारी, स्ट्रिटलाईट अदींची अजिबात सोय नव्हती. त्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी तत्कालीन आमदार, महापौर आदींशी संपर्क साधून जास्तीत जास्त तक्रारींचे निवारण करुन घेतले. इलेक्ट्रीसीटी ट्रान्सफॉर्मरसाठी आणि इतर कामासाठी आम्ही वैयक्तीकरित्या रक्कम दिली. त्याचप्रमाणे आर्थिक सहाय्य नागरिकांकडून जमा केले. येथील नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आम्ही आनंद साप्ताहिक फंडाची स्थापना केली. दर सोमवारी आणि सणासुदीना भगवान महादेव (शिवाची) पुजा अर्चना करण्यासाठी आनंदनगर परिसरात शिवमंदीर नव्हते म्हणून आम्ही शिवमंदीर विश्वस्थ मंडळची स्थापना केली आणि त्याद्वारे शिवमंदीराची भव्य वास्तु उभा केली. आज हजारो शिवभक्त येथे पुजाअर्चा करत आहेत. येथील महिलांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखात सामिल व्हावे आणि आनंदनगरच्या जडनघडणीमध्ये सहभागी व्हावे यासाठी आम्ही येथील कांही प्रमुख महिलांना बोलावून घेऊन उत्कर्ष महिला मंडळाची स्थापना केली. या मंडळाद्वारे अनेक सामाजिक, बौधिक आणि महिला सबलीकरणासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आनंदनगर संघटना असो, शिवमंदीर असो अगर उत्कर्ष महिला मंडळ असो आम्ही सरकारकडून कोणतीही मदत अद्यापही घेतलेली नाही. सर्व खर्च आम्ही वैयक्तीक त्याचप्रमाणे देणगीद्वारे करत आहोत. आमच्या कार्यास आपण सर्वांनी यापूर्वी केलेल्या सहकार्याप्रमाणेच यापुढेही करावी अशी सर्वांतर्फे मी आपणास आवाहन करतो असे संघटनेचे सेक्रेटरी एस. एस. वेसणे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.
प्रमुख पाहुणे परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी आनंदनगर संघटना म्हणजे एक सुसंकृत संघटना असून उत्तम संघटना कशी असावी हे संघटनेने आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा, निवृत्तांचा अरणि गुवरी विद्यार्थ्यांचा सत्कार करुन दाखवून दिले आहे असे सांगितले. रमेश गोरल यांनी या संघटनेचे कौतुक करताना मी अनेक संघटना पाहिल्या पण नागरिकांसाठी प्रामाणीक पणे कार्य करणारी या संघटनेसारखी संघटना पाहीली नाही असे सांगितले. आप्पाजी गोरल यांनी संघटनेला शुभेच्छा देताना या संघटनेसाठी समरस होऊन येथील विकासासाठी सर्वतोपरी सहाय्य करेन असे सांगितले. प्रमुख वक्ते शेखर करंबळकर यांनी आपल्या प्रोबधनकर भाषणात ज्येष्ठांचा आदर ठेवून त्यांचा यथोचित्त सन्मान करणे अत्यंत जरुरीचे आहे. माणुसकीचा ओलावा आटत चाललेला आहे. सेवानिवृतांविषयी बोलताना सेवेत असताना आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य यात फरक असला तरी परिस्थितीशी जमवून घेऊन मार्गक्रमण करणे जरुरीचे असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विशेष सन्मान कोणालाही प्राप्त होत नाही त्यासाठी अपार कष्ट मेहनत करावी लागते. विद्यार्थी दशेमध्ये प्रामाणिकपणे अभ्यासू वृती बाळगल्यास परिक्षामध्ये उतुंग यश प्राप्त करता येते. आप्पाजी कुगजी यांनी आनंदनगर संघटनेच्या कार्याचा आढावा घेताना सदर संघटना आदर्श बनविण्यासाठी सदस्यांनी अपार कष्ट केल्याचे सांगितले. आपल्यासारख्या मान्यवरांनी वेळोवेळी भेटी देऊन प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. परशराम घाडी यांनी आभार प्रदर्शन करताना उपस्थितांनी या कार्यक्रमास भरघोस पाठींबा दिल्याबद्दल त्याचप्रमाणे सर्व पाहुण्यांनी सहकार्य केल्याबद्दल आणि सन्मानप्राप्तांनी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. सुत्रसंचलन किरण करंबळकर आणि एस. एस. वेसणे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta