Sunday , September 20 2026
Breaking News

श्री गणेश ट्रॉफी सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स, कंग्राळ गल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश ट्रॉफीच्या ४७व्या वर्षातील सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी १० वाजता उत्साहात झाले.

स्पर्धेचे उद्घाटन पंच व माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शंकरराव बडवानाचे, विजय मोरे आणि सुहास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंच बाबुराव कुट्रे, दिशा सुहास अडकूरकर तसेच दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

एस.पी. कार ॲक्सेसरीजचे संचालक शरद पाटील व सुहास पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी अनुभवी खेळाडू अरुण पठाणे, सुरेश गडकरी, मंगेश केकरे आणि अशोक अष्टेकर यांचे स्वागत करण्यात आले.

स्पर्धेच्या आयोजनासाठी मैदानातील विविध व्यवस्था सांभाळणारे पंकज पाटील, अनिल पाटील, गंगाधर पाटील, सुनील पाटील, सुशांत शिंदे, रोहित मुरकुटे, शाहू ऊर्फ विनायक निळकंठाचे, रोहित निर्मळकर यांच्यासह सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

दरम्यान, दैविक अविनाश अष्टेकर या नवोदित खेळाडूची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील संघात निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करून स्वागत करण्यात आले. तसेच त्याला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली.

स्पर्धेला क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पुढील काही दिवसांत रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *