







परमात्मराज महाराज; शेंडूर मध्ये राधाकृष्ण मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना
निपाणी (वार्ता) : मथुरेला अष्टमीच्या दिवशी विष्णूचे आठवे रूप असणारा श्रीकृष्णाचा अवतार प्रकट झाला. वसुदेव व देवकी यांच्या पोटी कृष्णाचा क्षत्रिय कुळात जन्म झाला.मात्र गोपालक वर्गात वैश्य कुळात त्याचे पालन-पोषण झाले. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा अवतार असून, ‘सारे एक’ हा अन्वयार्थ श्रीकृष्णाच्या जीवनातून पाहायला मिळतो, असे प्रतिपादन आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाचे परमात्मराज महाराज यांनी केले. रासाई शेंडूर येथील कुंभार समाजातर्फे नूतन श्री राधाकृष्ण मंदिरात वास्तुशांती, होमहवन व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. त्यावेळी परमात्मराज महाराज बोलत होते.
परमात्मराज महाराज म्हणाले, श्रीकृष्णाचे चरित्र आजही प्रत्येकाला आकर्षित करते. राधेला कृष्णाची अल्हादिनी शक्ती म्हणून ओळखले जाते. श्रीकृष्णाच्या मुखातून जीवनाला अखंडपणे मार्गदर्शन करणारी भगवद्गीता मानवजातीला लाभल्याचे सांगितले
आमदार शशिकला जोल्ले यांनी, श्रीकृष्णाच्या विविध लीलांचा आढावा घेतला. यावेळी गावातील विविध भजनी मंडळांनी रात्री हरिजागर करीत भक्तिगीते व भजने सादर केली. पहाटे श्रीकृष्ण जन्मकाळाचा सोहळा साजरा करण्यात आला. रात्री शोभाताई साठे यांचा कार्यक्रम झाला. रात्री १२.०५ वाजता श्रीकृष्ण जन्मकाळ सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, सहकाररत्न उत्तम पाटील, सुजित जोशी, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, बाळासाहेब सरकार यांच्यासह नगरसेवक आणि भाविक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta