Sunday , September 20 2026
Breaking News

बालसंमेलनामुळे कलाविष्काराला चालना

Spread the love

 

परशराम कदम; कुर्ली येथे बालसंमेलन उत्साहात

निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थी केंद्रित उपक्रम आवश्यक आहेत. बालसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला चालना देणारे प्रभावी माध्यम असल्याचे मत मत्तीवडे येथील युवा व्याख्याते परशराम कदम यांनी व्यक्त केले. एच जे सी चीफ फौंडेशन व राज्य मराठी विकास संस्था यांच्यातर्फे आयोजित सातव्या बालसंमेलनच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत ते होते.अध्यक्षस्थानी माजी सैनिक शिवाजी चौगुले हे होते.
डी. एस. चौगुले यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. सी. बी. कोंडेकर यांनी योगाचे महत्व, एल. बी. बिरन्नावर यांनी शालेय शिस्त, कृष्णात माने यांनी खेळ व पालकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी विविध गटातील कुस्ती व ज्युदो स्पर्धा घेण्यात आल्या.
दुसऱ्या सत्रात काव्य वाचन, अभिनय सदरीकरण, संवादकौशल्य व मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले, ए. बी. माने, पी. एस. ढगे, आर. एस. चौगुले, एस. के. देसाई, एल. एस. चौगुले,एल. एम. रबकवी, सुभाष चौगुले, संदीप पिष्टे, लक्ष्मण पोवार, यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. एस. आर. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *