Sunday , September 20 2026
Breaking News

बोरगाव जय गणेश मल्टीपर्पज सोसायटीला १४.४८ लाखाचा नफा

Spread the love

 

संस्थापक अभयकुमार मगदूम ; १७ व्या वार्षिक सभेत माहिती

निपाणी (वार्ता) : निस्वार्थी संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा व सभासदांच्या विश्वासामुळे जय गणेश मल्टीर्पपज सोसायटीने आर्थिक वर्षात प्रगती साधली आहे. सर्वांच्या सहकार्याने हिरेकुडी व कणगला येथे शाखा सुरु करण्यात येणार आहेत. संस्थेला आर्थिक वर्षात १४ लाख ४८ हजाराचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभयकुमार मगदूम यांनी दिली.
बोरगाव येथील जय गणेश मल्टीपर्पज सोसायटीच्या १७ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
मगदूम म्हणाले, १०२४ सभासद, ११ लाख ९६ हजार भाग भांडवल, १४ कोटी ६३ लाख ५८ हजार रुपये ठेवी, ५ कोटी ५६ लाख ५४ हजार रुपये गुंतवणूक, ९ कोटी ३१ लाख ६१ हजार रुपये कर्ज वितरण, १४ लाख ४८ हजार रुपयांचे नफा झाला असेल सभासदांना १२ टक्के लाभांश देणार असल्याचे सांगितले.
व्यवस्थापक संतोष हंचनाळे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करीत मंजुरी मिळविले. संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सभेस नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, उपाध्यक्ष अॅड. सचिन रोड्ड, राजू मगदूम, मनोजकुमार पाटील, बी. टी. वठारे, बी. जे. पाटील, अरुण बोणे, अभय करोले, शितल गोरवाडे, पिरगौडा पाटील, अशोक पाटील, जंबू मळवाडे, तेजपाल मगदूम, प्रकाश चौगुले यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *