Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीत २२ पासून हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेबांचा ऊरूस

Spread the love

 

अध्यक्ष बाळासाहेब सरकार :२३ रोजी ऊरूसाचा मुख्य दिवस

निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क.स्व) यांचा उरूस मंगळवार (ता.२२) ते रविवार (ता.२७) या काळात साजरा होणार आहे. त्याची तयारी सुरू असल्याची माहिती उरूस उत्सव कमिटी अध्यक्ष, माजी नगरसेवक बाळासाहेब देसाई- सरकार यानी दिली. येथील चव्हाणवाड्यात आयोजित ऊरुस कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.

बाळासाहेब सरकार म्हणाले, शनिवारी (ता.१२) पासून चव्हाणवाडा व दर्गा देवस्थान येथे ताशा, सनई वादनास सुरुवात झाली आहे. शनिवारी (ता.१९) चव्हाण वारसांच्या हस्ते चुना चढविला जाणार आहे. सोमवारी (ता. २१) चव्हाण वारसांच्या हस्ते मंडप चढविला जाणार आहे. मंगळवारी (ता.२२ ) गंधरात्र असून गंध चव्हाणवाड्यातून मिरवणुकीने निघणार आहे. या दिवशीच बेडीवाल्यांचा उरूस आहे.
बुधवारी (ता.२३) भर उरूस असून यादिवशी चव्हाणवाड्यातून येणारा गलेफ पहाटे चढविण्यात येणार आहे. गुरुवारी (ता.२४) सायंकाळी खारीक, उदीचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता.२५) मानाचे फकीर यांची रवानगी व भंडारखाना, रवीवारी (ता.२७) पाकाळणी कार्यक्रम व गोडा नैवेद्य दाखवला जाणार आहे. उरूस काळात आतषबाजी होणार आहे. उसानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून यामध्ये ओपन गावगन्ना बैलगाडी, घोडा बैलगाडी, गाडी मागून श्वान पळवणे, घोडागाडी शर्यती, कुस्त्यांचे मैदान, कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. बैठकीत दर्गाहचे मुजावर शकील मुजावर, अहमदअली मुजावर यांचा सत्कार झाला. यावेळी नगरपालिकेतर्फे स्वच्छता, पाणी व इतर सोय केली जाणार आहे. तर ऊरुस काळात वीजपुरवठा निरंतरपणे करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहणार असून पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पृथ्वीराज देसाई -सरकार रणजीतसिंह देसाई -सरकार, संग्रामसिह देसाई – सरकार, राजूबाबा निपाणकर, विवेक मोकाशी, बाळासाहेब पोतदार, प्रकाश पाटील, जयराम मिरजकर, संभाजी मुगळे, शरद मळगे, विश्वास माळी, संजय माने, अतिश सुतार, सुजित गायकवाड, शितल बुडके, शामराव कांबळे, राजू शेटके, बाळासाहेब मोरबाळे, अतिशय शिंदे, संभाजी मुगळे, सचिन पावले आनंद लोकरे, दादासाहेब कांबळे राजकुमार मेस्त्री यांच्यासह उरूस कमिटी सदस्य व सेवेकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *